मायणी परिसरात विविध संस्थाच्यावतीने पत्रकारांचा गौरव

मायणी : शहर पत्रकारांचा सत्कार करताना सुरेंद्र गुदगे व उपस्थित पत्रकार

मायणी, दि. 9 (प्रतिनिधी)- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनानिमित्त मायणी ता. खटाव येथील पत्रकारांचा मायणी व परिसरातील विविध संस्थांच्यावतीने सत्काराचे आयोजन करून पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. मायणी अर्बन बॅंकेचे चेअरमन व जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे यांचे हस्ते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व मायणीचे माजी उपसरपंच दादासो कचरे त्याचप्रमाणे मायणी अर्बन बॅंकेचे व्यवस्थापक निकम यांच्या मुख्य उपस्थितीत पत्रकारांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे रुरल इन्स्टिट्यूट ऑफ मायणी यांच्यावतीने संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. एम. आर. देशमुख व अध्यक्ष पाटेकर यांचे हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यशोदीप पतसंस्थेचे माजी चेअरमन डॉ. मकरंद तोरो, समाजभूषण हणमंतराव साळुंखे पतसंस्था कलेढोणचे विद्यमान चेअरमन संजीव साळुंखे यांनी पत्रकारांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. मायणी वनविभागाचे वनक्षेत्रपाल काश्‍मीर शिंदे तसेच आदिवासी पारशी समाजाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा राणी ताई शिंदे यांनी येथील द. किंग रेस्टॉरंटमध्ये सन्मानचिन्ह श्रीफळ देऊन सर्व पत्रकारांचा सन्मान केला. राजे प्रतिष्ठान ग्रुपच्यावतीने अध्यक्ष अविनाश देशमुख व विशाल चव्हाण तसेच किल्ले संर्वधन ग्रुपतर्फे शुभम माळी व सूरज माळी यांनी सत्कार केला. खटाव पंचायत समितीच्यावतीने वडूज येथे सभापती कल्पना मोरे, उपसभापती संतोष साळुंखे, जि. प. सदस्य प्रदीप विधाते, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य नंदकुमार मोरे, गटविकास अधिकारी रमेश काळे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, पं. स. सदस्य आनंदराव भोंडवे व मान्यवरांचे हस्ते तालुक्‍यातील सर्व पत्रकारांना श्रीफळ, गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सदर सर्व सत्कार समारंभास मायणीचे पत्रकार महेश तांबवेकर, पोपट मिंड, सुमित कोळी, प्रकाश सुरमुख, संजय जगताप, पांडुरंग तारळेकर, संदीप कुंभार, महेश जाधव, अंकुश चव्हाण, मारुती पवार, स्वप्नील कांबळे, सतीश डोंगरे, दीपक नामदे उपस्थित होते.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)