सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांची माहिती
मायणी, दि. 11 (प्रतिनिधी) – मायणी, ता. खटाव येथील उमेश मोरे यांचे लक्ष्मीनारायण एजन्सी हे दुकान अज्ञात चोरट्यांनी गेल्या महिन्यात फोडले होते. यावेळी दुकानातील दहा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. त्यानंतर पुन्हा मोरे यांच्याच मालकिचे निमसोड येथीलही दुकान चोरट्यांनी फोडले होते. एकाच व्यक्तीची दोन दुकाने फोडल्यामुळे मायणी पोलासांसमोर चोरट्यांना पडकण्याचे आव्हान निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांकडून सुरु असलेल्या तपासामुळे अखेर दोन आरोपिंना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
अधिक माहिती अशी, मायणी व निमसोड या दोन्ही ठिकाणी एकसारखी चोरी झाली होती. या चोरीबाबत कोणताही धागा दोरा नव्हता, मात्र दोन्ही ठिकाणी एकच वाहन असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात होते. एवढ्याच माहितीवर पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस आयुक्त विजय पवार व उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, पोलीस निरीक्षक यशंवत शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा तपास सुरु केला. वडुज, मायणी, निमसोड, म्हसवड व सोलापूर जिल्ह्यातील अकलुज, नातेपुते, टेंभुर्णी आदी ठिकाणी अशाच प्रकारच्या चोऱ्या झालेली माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्यासह पोलीस नाईक बापू खांडेकर, पोलीस शिपाई नवनाथ शिरकुळे व राघु खाडे यांनी सलग 15 दिवस अकलुज परिसरामध्ये संशियत वाहनाचा व आरोपींचा शोध घेउन आकाश करणसिंह सांळुखे व विशाल महादेव पवार (रा. अकलुज, जि.सोलापूर) या दोघांना ताब्यात घेतले व अटक केली.
मंगळवार, 10 रोजी वडुज न्यायालयात 4 दिवसाची पोलिस कोठडी मिळाली. यामध्ये सदर आरोपींनी मायणी निमसोडसह म्हसवड पेट्रोल पंप दरोडा व अकलूज परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोरि केली असल्याची कबुली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)