मायणीत आजपासून सद्‌गुरू सरुताई माऊलींचा पुण्यस्मरण सोहळा

मायणी, दि. 25 (वार्ताहर) – मायणी, ता. खटाव येथील संत सद्गुरू मातोश्री सरुताई माऊली यांच्या सहाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.26 ते दि.30 अखेर हा सोहळा होणार आहे. मुख्य दिवशी दि. 30 रोजी माऊलींची पालखी व रथसोहळा आहे. याच दिवशी पहाटे 4.32 वाजता माऊलींच्या फुलांची वेळ असून सर्व भाविक भक्तांनी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संत मातोश्री सरुताई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रवींद्र बाबर यांनी केले आहे.
पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त बुधवार दि. 26 रोजी सकाळपासून “सरुताई लीला अमृत’ ग्रंथाचे पारायण व नामस्मरण सोहळा, दुपारी 1 ते 3 व 4 ते 6 वाजेपर्यंत भजनी मंडळाचे कार्यक्रम, रात्री 9 ते 11 कीर्तन, रात्री 11 ते पहाटे 4 भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. दि. 27 रोजी दुपारी 1 ते 3 व दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत भजन, रात्री 9 ते 11 कीर्तन, रात्री 11 ते पहाटे 4 भजन आदी
कार्यक्रम होणार आहेत. दि. 28 रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथवाचन व नामस्मरण, दुपारी 1 ते 3 भजन, दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत स्वरगंधार अंध मुलांचा गायनाचा कार्यक्रम, रात्री 9 ते 11 बालकीर्तनकार शिवलीला पाटील यांचे कीर्तन, रात्री 11 ते पहाटे 4 भजन, दि.29 रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथवाचन व नामस्मरण, दुपारी 1 ते 3 भजन, दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत “चला खेळूया मंगळागौर, रात्री 9 ते 11 कीर्तन, रात्री 11 ते पहाटे 4 भजन कार्यक्रम होणार आहे.
दि.30 रोजी मुख्य दिवशी पहाटे फुलाचे कीर्तन होईल. पहाटे 4.32 वाजता फुलांचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता काल्याचे कीर्तन होईल. सकाळी 11 वाजता डॉ. दिलीप येळगावकर व सौ. येळगावकर यांच्या हस्ते माऊलींची आरती होईल. यानंतर पालखी व रथसोहळ्यास सुरवात होणार आहे. गुरु मुगुटराव लाला पालखी दिंडी सोहळा व किरोलीचे लक्ष्मण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगण सोहळा व शैलेश माने यांचा अश्व रिंगण सोहळा होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)