मायणीत अज्ञाताकडुन वनक्षेत्राला आग

वन कर्मचारी व ग्रामस्थांकडून आग आटोक्‍यात : वनसंदा वाचवण्यात यश

मायणी – मायणी येथी पक्षी आश्रयस्थान असलेल्या परिसरास समाजकंटकांनी आग लावली. यामुळे 65 एकर क्षेत्रातील वनसंपदा जळून खाक होण्याचा धोका निर्माण झाला होता. तथापि, वन कर्मचारी व ग्रामस्थांकडून वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मायणीची वनसंपदा वाचविण्यात यश आले.
याबाबत माहिती अशी, मल्हारपेठ -पंढरपूर रोडलगतच्या दोन्ही बाजूस सुमारे 65 हेक्‍टरमध्ये वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रामध्ये विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून या वनउद्यानाला आग लावण्यात आली होती. वनक्षेत्राच्या मार्गातून मायणीचे पोलीस पाटील प्रशांत कोळी हे तेथून जात होते. त्यांच्या निदर्शनास आग आल्यानंतर त्यांनी दूरध्वनीवरून तात्काळ वन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला व वनक्षेत्राला आग लागल्याची माहिती दिली. वनविभागातील कर्मचारी अभिजीत खाडे, दुर्योधन जाधव, मोहन जाधव, मल्हारी जाधव, अंकुश पवार दादासाहेब लोखंडे, संदिप कुंभार, दत्ता कोळी, विजय माळी, शुभन माळी, रवींद्र देशमुख यांच्यासह त्यावेळी फ्रेंड्‌स ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव वसहकारी यांनी वनक्षेत्रात धाव घेवून आग आटोक्‍यात आणली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)