मायणीच्या सिद्धनाथाचा दि. 8 रोजी रथसोहळा

मायणी, दि. 8 (प्रतिनिधी) – खटाव तालुक्‍यातील मायणी गावचे ग्रामदैवत श्रीसिद्धनाथाच्या वार्षिक रथोत्सव निमित्ताने दि. 7 ते 9 अखेर विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन नाथ-मारुती देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. मायणीच्या श्रीसिद्धनाथाचा रथ सोहळा (रिंगावण) शनिवार दि. 8 रोजी होणार आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही देखील जि.प. सदस्य सुरेंद्र गुदगे व माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्या नेतृत्वाखाली दोन गटांमार्फत या यात्रेचे निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाथमारुती देवस्थान ट्रस्टच्यावतीने शुक्रवार दि. 7 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून गारुडी, मसाईवाडी (माण), बनपुरी (आटपाडी), गोरडवाडी (माळशिरस),बनगरवाडी (सांगोला) या भागातील गजी नृत्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी वाजता देवाचा छबिना होणार आहे. शनिवार, दि. 8 रोजी सकाळी वाजता रथ सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. रथपूजन नाथ-मारुती देवस्थान ट्रस्टचे चेअरमन विकास देशमुख यांच्या हस्ते होणार असून जि. प .सदस्य सुरेंद्र गुदगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच दिवशी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत वैभव ऑर्केस्ट्रा, कोल्हापूर यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. दि. 9 रोजी सकाळी 8 वाजता कु. कमल कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार असून दु. 2 वाजता कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या यात्रा कमिटीच्या चेअरमनपदी डॉ. विकास देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, स्फूर्ती क्रीडा मंडळ यांच्या वतीने व डॉ. दिलीप येळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दि. 8 रोजी ऑर्केस्ट्रा झंकार, कोल्हापूर यांचा कार्यक्रम होणार असून दि. 9 रोजी सकाळी 8 वाजता कु. प्रणाली पडळकर यांचा लोकनाटय तमाशा होणार आहे. दुपारी कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. स्फूर्ती क्रिडा मंडळाच्या यात्रा कमिटीच्या चेअरमनपदी दिपक देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)