नवी दिल्ली: मायक्रोसॉफ्ट आणि टेक महिंद्रा यांनी भारतात स्पॅम कॉलचा प्रश्‍न दूर ठेवण्यासाठी डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्‍नॉलॉजी (डीएलटी) आधारित यंत्रणा प्रस्तुत केली आहे. हि यंत्रणा दूरसंचार नियामक प्राधिकरणद्वारा जारी केलेल्या नियमांनुसार आहे व ब्लॉक चैन तंत्रज्ञानावर आधारित आहे. यासाठी मायक्रोसॉफ्टच्या ऍझ्युर सोल्यूशनचा वापर करण्यात आला असल्याचे दोन्ही कंपन्यांनी सांगितले. या यंत्रणेचा उद्देश देशातील अनावश्‍यक व्यावसायिक संपर्क समस्या कमी करणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)