मायक्रोसॉफ्टचे बाजार मूल्य 1 लाख कोटी डॉलर होणार

वॉशिंग्टन – मायक्रोसॉफ्ट कंपनीचे वर्षभरात बाजारमूल्य 1 लाख कोटी डॉलर्सची उंची गाठणार असा मॉर्गन स्टॅनले यांच्या अहवालात सांगण्यात आले. पुढील 12 महिन्यामध्ये कंपनीचा समभाग 130 डॉलर्सवर पोहोचेल असा अनुमान करण्यात आला आहे. सध्या प्रतिसमभाग 94 डॉलर्स असून सोमवारी त्यामध्ये 7 टक्क्‌यांनी वृद्धी झाली होती.

ऍपल, अल्फाबेट (गुगलची पालक कंपनी) आणि ऍमेझॉन या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे बाजारमूल्य लवकरच एक लाख कोटी डॉलर्सवर पोहोचेल असे सांगण्यात आल्यानंतर त्यामध्ये आता मायक्रोसॉफ्टचाही समावेश झाला आहे. मायक्रोसॉफ्टचे सध्याचे बाजारमूल्य 722 अब्ज डॉलर्स असून, त्या बरोबरीत ऍपलची 876 अब्ज डॉलर्स, ऍमेझॉन 753 अब्ज डॉलर्स आणि अल्फाबेट 731 अब्ज डॉलर्स आहेत. कंपनीच्या क्‍लाऊड सेवेचे वाढते ग्राहक, मजबूत वितरण प्रणाली, उत्तम ग्राहक सेवा आणि उत्पन्नात वाढ होत असल्याने लवकरच कंपनीचे बाजारमूल्य लाख कोटी डॉलर्सवर पोहोचेल असे मॉर्गन स्टॅनलेने म्हटले. कंपनीची क्‍लाऊड सेवा विस्तारत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)