मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये पालक सभा व आरोग्य जनजागृती

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये “महायज्ञ आरोग्याचा, संकल्प निरोगी मावळचा’ या महा आरोग्य शिबिराची माहिती पालक सभेत देण्यात आली. कार्यक्रमास अध्यक्ष गणेश खांडगे, प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळ, सभापती संग्राम काकडे, तसेच एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका मधुबाला गैरोला उपस्थित होत्या.

संग्राम काकडे यांनी मावळ तालुक्‍यात होणाऱ्या आरोग्य शिबिराची चाचणी, औषध-उपचार, मोफत शस्रक्रिया यांची माहिती दिली. स्वच्छ सुंदर परिसरातून, सुंदर सुसंस्कृत नागरीक घडतात. या महायज्ञातून संपूर्ण मावळ तालुक्‍याला निरोगी बनवण्याचा मानस आहे. यातून सामान्य लोकांना शिबिराचा उपयोग करून घेता येईल व त्यांचे आरोग्य चांगले ठेवता येईल. स्वच्छ व सुंदर भारत ही संकल्पना पूर्ण करण्याचा मानस ठेऊन सुंदर मावळ, सुंदर तळेगाव बनवायचे आहे, असे काकडे म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षण प्रणालीच्या अत्याधुनिक वापरातून विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाचा नियोजनबद्ध कार्यक्रम मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थांना आता उपलब्ध केला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील पब्लिक स्कूल सोबत झालेल्या सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली. इंग्रजी माध्यमातील दर्जेदार शिक्षणासोबत जर्मन, जापनीज आणि फ्रेंच भाषांचे प्रशिक्षण, सायबर ऑलिंपियाड, होमी भाभा सायन्स एक्‍झाम, भारतीय विद्या भवनचे संस्कृत भाषेच्या परिक्षा, गणित विषयाच्या राज्य पातळीवरील परिक्षा यासह अनेक सर्वंकष सुविधा आता सुरू होत आहेत. लहान वयातच अशा पद्धतीने सर्व विद्यार्थांना घडवणे. विद्यार्थांच्या सुरक्षेसाठी शाळेत प्रत्येक क्‍लासरूममध्ये सी. सी. टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. विद्यार्थांना अभ्यासात आवड निर्माण होण्यासाठी प्रत्येक क्‍लासरूममध्ये ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

विद्यार्थांच्या वाहतुकीविषयी विशेष काळजी घेण्यात आली आहे. पाल्याचे घर ते शाळा यामधील अंतर ठरवून त्यानुसार बस सुविधा उपलब्ध केली गेली आहे. जपानच्या लेगो कंपनीसोबत झालेल्या करारामुळे रोबोटिक विषयाचा अभ्यासक्रम देखील विद्यार्थांना शिकता येईल. त्यामुळे विद्यार्थांना भविष्यात या सर्व शिक्षणाचा मोठा उपयोग करून घेता येईल. त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल, असे मत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका गैरोला यांनी व्यक्‍त केले. मुख्याध्यापिका प्रणाली गुरव यांनी प्रास्ताविक केले व धनश्री डंबे यांनी सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)