मान्सून महाराष्ट्राच्या उंबऱ्यावर…

वाटचाल जोमाने : कर्नाटक किनारपट्टीचा भाग व्यापला
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.30 – केरळात काल दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल जोमाने सुरूच असून बुधवारी तो कर्नाटकात दाखल झाला आहे. कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांशी भाग आणि अंतर्गत कर्नाटकाच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे. त्याचबरोबर तामिळनाडूमधील काही भागसुद्धा मान्सूनने व्यापला आहे.
ंयंदा नियमित वेळेपेक्षा तीन दिवस आधीच मान्सून केरळात दाखल झाला आहे. याबाबतचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. तो अचूक ठरला असून मंगळवारी मान्सून केरळात दाखल झाला. त्यानंतर बुधवारी मान्सूनमध्ये आणखी प्रगती झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. मान्सून अरबी समुद्र कर्नाटक किनारपट्टी, केरळ आणि तामिळनाडूनीतील बंगालच्या उपसागराच्या काही भागात तो दाखल झाला आहे.

पुण्यात पावसाची शक्‍यता
मान्सूनची वाटचाल कर्नाटकपर्यंत झाली असून याच वेगाने जर तो पुढे सरकत राहिला, तर राज्यातसुद्धा लवकर दाखल होईल. राज्यात आज कोकणात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. येत्या 48 तासांत राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. पुणे शहरातही येत्या 24 तासात ढगाळ हवामान राहून पावसाच्या एक ते दोन सरी कोसळतील, अशी शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)