मान्सून चार-पाच दिवसांत अरबी समुद्रात

पुणे – अंदमान निकोबार बेटावर दाखल झालेल्या मान्सूनची आगेकूच सुरु असून आज तो आग्नेय बंगालच्या उपसागरातील काही भागात तर पुर्व मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागात दाखल झाला आहे. मान्सूनची अशीच वाटचाल राहिली तर येत्या चार ते पाच दिवसात तो अरबी समुद्रात दाखल होईल अशी शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. रविवारी मान्सून हा अंदमान-निकोबारच्या बेटावर दाखल झाल्यानंतर मान्सूनची प्रगती योग्य पध्दतीने सुरू आहे तसेच मान्सूनसाठी असणारी अनुकूल परिस्थिती सध्या बगालच्या उपसागरात निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याची आगेकूच सुरु आहे. अशीच आगेकूच सुरु राहली तर लवकरच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल होईल. केरळात सुध्दा मान्सून नियमित वेळेपेक्षा लवकरच दाखल होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत पण नक्की कधी दाखल हाईल हे आत्ताच स्पष्ट करता येणार नाही असे ही हवामान खात्याच्यावतीने सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)