पुणे- मोसमी वारे वाहण्यास सुरवात झाल्याने आता यापुढील काळात तापमानात घट होऊन राज्यातील विविध भागात मान्सून पुर्व पावसाच्या सरी सुद्धा कोसळण्याची शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.मध्य महाराष्ट्र,कोकण आणि मराठवाड्यात साधारणात; हवामानात हे बदल होणार आहे.विदर्भात मात्र अजून काही दिवस तापमान उष्ण राहण्याची शक्‍यता आहे.

राज्यात गेले आठवड्यापासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली असली तरी उकाडा मात्र कायम होता.या पावसाने तापमानात मात्र घट झाली नव्हती.आता मात्र मोसमी वारे वाहण्यास सुरवात झाली आहे.या वाऱ्यामुळे तापमानात घट होते,ज्या पश्‍चिम महाराष्ट्रात काही दिवसापुर्वी तापमान चाळीस अंशापर्यत पोहचले होते त्याठिकाणी आत तापमान हे 35 ते 37 अंशा पर्यंत खाली घसरले आहे.कोकणात तर अनेक भागात दोन ते तीन दिवसांपासून रोज पाऊस पडत आहे.मराठवाड्यातील तापमानात ही घट झाली आहे.

मोसमी वारे वाहू लागल्याने आता त्याबरोबर ढग सुध्दा येताता त्यामुळे मान्सून पुर्व पावसाच्या अनूकूलतेसाठी हे वातावरण योग्य आहे,हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार त्यामुळे राज्यात गुरुवार पासून मान्सून पुर्व पावसाचे आगमन होणार आहे.हा पाऊस कधी केव्हा कसा पडेल याचा अंदाज मात्र आत्ताच करता येणार नाही.

अरबी समुद्रात आलेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत असून, मंगळवारी सकाळी हे क्षेत्र अधिक ठळक झाले होते. त्यालगत समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत होते. गुरुवारपर्यंत या कमी दाबक्षेत्राची तीव्रता आणखी वाढणार असून, ते आदनच्या खाडीकडे सरकून जाणार आहे. दरम्यान दक्षिण उत्तर प्रदेशापासून मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असून, गुरुवारपासून पूर्वमोसमी पावसाची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यात आज सर्वाधिक तापमान अकोला येथे 42.3 अंश सेल्सिअस नोंदिवले गेले.याशिवाय विदर्भ वगळता अन्य ठिकाणच्या तापमानात कमालीची घट झाली आहे,पुण्यात ही आज तापमान 38.1 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या चोवीस तासात गोव्यासह संपुर्ण राज्यात विविध भागात मेघगर्जनेसह पाऊस होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)