मान्सूनचे आगमन काहीसे लांबण्याची शक्‍यता

अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती

प्रभात वृत्तसेवा
पुणे,दि.22 – “सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात आणखी एक चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत मिळाले आहेज. हे चक्रीवादळ बुधवारी तयार होणार असून ते भारतीय किनारपट्टीवर धडकण्याची शक्‍यता कमी आहे.
गेल्या आठवड्यात ज्याप्रमाणे “सागर’ चक्रीवादळ ऐनवेळी दिशा बदलून ते ओमानकडे सरकले होते, त्याचप्रमाणे सध्या अरबी समुद्रात निर्माण होणारे हे वादळसुद्धा दिशा बदलून ओमानच्या दिशेने सरकरण्याची शक्‍यता आहे. हे चक्रीवादळ साधारणत: 26 मेदरम्यान ओमान बेटांवर धडकू शकते, असाही अंदाज आहे. सध्या अरबी समुद्रातील स्थितीबाबत हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. त्याला लागूनच चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मंगळवारी या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) तयार होणार असून, बुधवारी चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्‍यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 23 ते 26 मे या कालावधीत 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्‍यता असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, नैऋत्य मान्सून 23 मेपर्यंत अंदमानात दाखल होईल, अशी शक्‍यता होती. पण, सध्या हवामानात होत असलेल्या सततच्या बदलांमुळे अंदमानातील मान्सूनचे आगमन काहीसे लांबण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या स्थितीनुसार मान्सून अंदमानात दाखल होण्यासाठी आणखी दोन दिवासाची वाट पाहवी लागणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 25 मेनंतर अंदमानात पावसाला सुरूवात होण्याची शक्‍यता आहे. अंदमानातील मान्सूनच्या आगमनानंतरच तो केरळात कधी दाखल होईल, याचा अंदाज बांधता येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)