मान्सूनची वेगाने वाटचाल ; कर्नाटकात केली एन्ट्री

नवी दिल्ली : केरळमध्ये मंगळवारी आगमन केल्यानंतर मान्सूनने बुधवारी जोरदार वाटचाल करीत थेट कर्नाटकातील किनारपट्टी व अंतर्गत भागात प्रवेश केला आहे. ६ जूनपासून महाराष्ट्र आणि गोव्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनची वाटचाल वेगाने होत आहे़ बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्रातील मान्सूनच्या शाखेने अधिक वेगाने प्रगती करीत कर्नाटकाच्या अंतर्गत भागात प्रवेश केला आहे. मान्सूनने बुधवारी कर्नाटकातील शिराली, हसन, म्हैसूर, कडोईकनॉल, तुतीकोरीन तसेच तामिळनाडुच्या काही भागात प्रवेश केला आहे़ येत्या ४८ तासात ईशान्यकडील राज्यात मॉन्सून प्रवेश करण्याची शक्यता आहे.

-Ads-

पुढील तीन दिवसात तामिळनाडु, आंध्रप्रदेश, तेलंगणा या भागात प्रवेश करण्याचा अंदाज असून तेथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात म्यानमार जवळ बुधवारी सकाळी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो ईशान्य भारताकडे येण्याची शक्यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)