मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू

पुणे- नैऋत्य मोसमी वारे राजस्थानमधून माघारी फिरण्यास अनुकूलस्थिती निर्माण झाल्याने रविवारपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

मान्सूनच्या प्रवाहातील बाष्प कमी झाल्याने गेले काही दिवस राजस्थानसह देशाच्या वायव्य भागात कोरडे हवामान निर्माण झाले आहे. या भागात हवेचा दाबही वाढू लागला असून वाऱ्याची दिशा बदलली आहे. त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून राजस्थान, पंजाब, हरयाणा या राज्यातून माघारी फिरून गुजरात, मध्य भारतातून देशाच्या दक्षिणेकडील भागात दाखल होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कालावधीमध्ये कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाचा जोर वाढणार असून महाराष्ट्रसह मध्य भारतातील राज्यातही पावसाची शक्‍यता आहे. राज्यात सध्या वादळी पावसाने हजेरी लावली असून सकाळी कडक उन तर दुपारी उकाडा, त्यापाठोपाठ संध्याकाळी ढगाळ वातावरण आणि पाऊस असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. ही स्थिती आणखी दोन दिवस राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)