मान्यवरांना निमंत्रित करण्याचे काम आयोजकांचे, राज्य शासनाचा संबंध नाही – विनोद तावडे

मुंबई: अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला कोणाला बोलवायचे, कोणाला नाही, याचा संपूर्ण निर्णय हा संमेलनाच्या आयोजकांचा असून यामध्ये राज्य शासनाचा संबंध नसल्याचे मराठी भाषा विकास मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करण्यासाठी आयोजकांनी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले निमंत्रण अचानक रद्द केले आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे हे निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे पत्र आयोजकांनी त्यांना पाठविले आहे. यामुळे साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात कालपासून विविध माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा येत आहे. यासंदर्भात राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत बोलताना तावडे म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दरवर्षी राज्य शासनामार्फत अनुदान देण्यात येते. अखिल भारतीय साहित्य महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये राज्य शासन हस्तक्षेप करीत नाही. संमेलनाचे संपूर्ण वेळापत्रक हे आयोजक ठरवित असतात त्यामुळे जेथे राज्य शासनाचा संबंध नाही तेथे उगाचच राज्य शासनावर आरोप करण्यात येऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)