मान्यता न घेताच अभ्यासक्रम सुरू

पुणे – शासनाच्या महाडीबीटी संकेतस्थळावर महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन अर्ज भरत असताना पुणे विभागातील 151 महाविद्यालयांनी विविध अभ्यासक्रमांना मान्यताच घेतली नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयामार्फत महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अर्ज भरताना काही वेळा तांत्रिक अडचणीही निर्माण झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन सुधारणाही करण्यात आल्या आहेत. महाविद्यालयांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्यापूर्वी विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळविणे बंधनकारक करण्यात आले होते. याबाबत वेळोवेळी कार्यशाळा आयोजित करून महाविद्यालयांना सूचनाही देण्यात आल्या होत्या. विद्यापीठ व शासनाने परिपत्रकेही महाविद्यालयांना बजाविली आहेत. मात्र, अद्यापही बहुसंख्य महाविद्यालयांनी अभ्यासक्रमांना मान्यता घेतली नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यातील 97, नाशिकमधील 22, अहमदनगरमधील 32 अशा महाविद्यालयांचा या यादीत समावेश करण्यात आलेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अभ्यासक्रमांना मान्यता न घेणे ही बाब गंभीर असून शासनाकडून याबाबत नाराजी व्यक्‍त करण्यात आली आहे. महाविद्यालयांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करून अभ्यासक्रमांना तातडीने मान्यता घ्यावी, अशा सूचनाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाच्या उपकुलसचिवांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य व संचालकांना बजाविल्या आहेत.

प्रलंबित अभ्यासक्रमांच्या मान्यता प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी शासनाने येत्या 14 जानेवारीला सकाळी 10.30 वाजता विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागात कार्यशाळा घेण्याचे नियोजन केले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य व शिष्यवृत्तीचे कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहवे, असे आवाहनही विद्यापीठाकडून करण्यात आलेले आहे. त्याबाबतचे परिपत्रकही महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)