मानेवस्ती शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

कळस – माने-लावंडवस्ती (रुई, ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनाचे उद्‌घाटन सरपंच रूपाली कांबळे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी यशवंत कचरे, पोलीस पाटील अजितसिंह पाटील, नवनिर्माण प्रतिष्ठानचे आकाश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बापू लावंड, दीपक साळुंके, बबन मारकड, पद्माकर लावंड, ऍड. अमर मारकड, प्रवीण डोंबाळे, प्रीतम लावंड, किरण लावंड, ग्रामसेवक बनसुडे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील माने उपस्थितीत होते. या कार्यक्रमात मुक्त वर्ग ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी गीताबरोबरच देशभक्‍तीपर गीत, महाराष्ट्राची लोकधारा शेतकरी गीत आदी गाण्यांवर नृत्य सादर केले. तर यामध्ये अफजलखानाचा वध अर्थात प्रतापगडावरील पराक्रम हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला, तसेच अंधश्रद्धा नाटिका सादर करून लोकांमध्ये जनजागृती केली. कार्यक्रमाचे जमा झालेल्या लोकवर्गणीतून शाळा डिजिटल करण्याचा मानस मुख्याध्यापक सदाशिव रणदिवे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब थोरात व संजय लोहार तर सहशिक्षक मुंडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)