मानेवर कोयत्याने वार करुन तरुणाचा खून

मानेवर कोयत्याने वार करुन तरुणाचा खून
पुणे,दि.23(प्रतिनिधी)- किरकोळ कारणावरुन तरुणाच्या मानेवार कोयत्याने वार करुन खून करण्यात आला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाविरुद्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
विशाल मारुती कदम(27,रा.मंजारी-बुद्रुक, ता.हवेली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
फिर्यादी राहुल तुपारे व विशाल कदम हे एकमेकांचे मित्र आहेत. तर विशाल व आरोपी हऱ्या बबन खुडे याची रविारी (22 एप्रिल) रोजी मांजरी येथील अक्षय गार्डन येथे भांडणे झाली होती. एका मित्राच्या वाढदिवसानिमीत्त ते एकत्र आले होते. यावेळी हरी याने तुझा गेमच करतो अशी धमकी दिली होती. तर विशालने त्यास तुझ्या घराकडे लक्ष दे, मला दुपारी शिवीगाळ करायला नको हवी होतीस असे म्हटले होते. यानंतर विशाल झालेले भांडण विसरुन गेला होता. दरम्यान हऱ्याने त्याला रात्री दहावाजता मांजरी रेल्वे स्टेशन येथे गाठून त्याचा कोयत्याने वार करुन खून केला.
यासंदर्भात माहिती देताना सहायक पोलीस निरीक्षक एच.बी.बोबडे यांनी सांगितले या दोघांची यापुर्वी भांडणे झाली होती. ते अनेकदा एकत्र दारु पिण्यासाठी बसत होते. रविवारीही भांडणे झाल्यावर विशाल तेथून निघुन गेला होता. मात्र हऱ्याने राग मनात धरुन त्याचा पाठलाग केला. मांजरी रेल्वे स्टेशनजवळ त्याने विशालच्या मानेवर कोयत्याचा एक जोरदार घाव घातला. या एकाच घावात विशाल जागेवरच मृत झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)