मानाचा पाचवा गणपती : केसरी वाडा

यंदाचे मंडळाचे वर्ष १२५ वे 


मिरवणुकीस प्रारंभ सकाळी १० वाजता 


 श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ११.३० वाजता 

मानाचा पाचवा केसरी गणपतीची स्थापना लोकमान्य टिळक यांनी 1894 मध्ये विंचूरकर वाड्यात केली. तर 1905 पासून टिळकवाड्यात केसरी संस्थेचा गणेशोत्सव सुरू झाला. या उत्सवामध्ये लोकमान्य टिळक त्यांच्या व्याख्यान्यातून समाजप्रबोधनाचे काम करत होते. 1998 साली संत ज्ञानेश्‍वरांनी त्यांच्या ज्ञानेश्‍वरीमध्ये केलेल्या वर्णणाप्रमाणे केसरी गणपतीची मूर्ती तयार करण्यात आली. शेला, दागिणे, प्रतिके, मुकुंट, गंडस्थळ हे या मूर्तीची वैशिष्ट्ये आहेत. दरम्यान, केसरी गणपतीचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून, संस्थेचे सरव्यवस्थापक विश्‍वस्त डॉ. रोहीत दीपक टिळक यांच्या हस्ते गुरूवारी (दि. 13) सकाळी साडेअकरा वाजता प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

या मिरवणुकीला सकाळी 10 वाजता रमणबाग चौकातून सुरूवात होईल. त्यानंतर मिरवणूक लक्ष्मी रस्ता, विजय चित्रपटगृह, माती गणपती मार्गे टिळक वाड्यातील सभामंडपात दाखल होईल. या मिरवणुकीत केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक, सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक, विपणन व्यवस्थापिक डॉ. प्रणति रोहित टिळक, व्यवस्थापिका डॉ. गिताली मोने-टिळक तसेच केसरीचे सर्व अधिकारी, कर्मचारी आदी सहभागी होणार आहेत. त्यावेळी श्रीराम आणि शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाचा गजर असणार आहे. तर बिवडेंची सनई वादन असणार आहे. शहापूरकर हे सभामंडपात आकर्षक रांगोळी साकारणार आहेत. रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे यावर्षी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पुण्यात पाचवा मानाचा गणपती केसरी गणपती आहे. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव1894 पासून सुरू झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. पण 1905 पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथ होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. 1998 मध्ये इथली मोर्ती संत ज्ञानेश्‍वरांच्या ज्ञानेश्‍वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)