मानांकनापेक्षा तंदुरुस्ती महत्त्वाची – नदाल 

ब्रिस्बेन – स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल गुडघ्याच्या दुखापतीतून बरा झाला असून तो ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. याबाबत बोलताना नदाल म्हणाला, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्यापेक्षा शारिरीक तंदुरुस्ती टिकवून खेळाचा आनंद घेणे ही माझी प्राथमिकता आहे. सप्टेंबरमध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेच्या उपांत्यफेरीत दुखापतीने तोंड वर काढल्याने त्याने स्पर्धेतून सामन्यातून माघार घेतली होती आणि तेव्हापासून नदाल मैदानाच्याबाहेर आहे.

कारकिर्दीत 17 ग्रॅंडस्लॅमवर आपले नाव करणारा नदाल म्हणाला, मी माझा नैसर्गीक खेळ करण्यासाठी प्रयन्त करेल आणि प्रत्येक आठवड्यात स्वतःला स्पर्धात्म टेनिसमध्ये टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील. प्रत्येक सामन्यात चांगला खेळ करत राहणे आणि स्पर्धा जिंकणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण तेच माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. मागील वर्षात दुखापतींमुळे मला मोठ्या स्पर्धातून माघार घ्यावी लागली ते मला सहन होत नाही. नदाल जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असून याबाबत बोलताना तो म्हणाला, निश्‍चितच मला दुसऱ्या स्थानाऐवजी पहिले स्थान आवडेल पण ते माझे ध्येय नाही. मला जास्तीत जास्त वेळ स्वतःला तंदुरुस्त ठेऊन स्पर्धा जिंकायच्या आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)