मानसी यादवचे यश कौतुकास्पद : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा – कराटे, मार्शल आर्टश यासारखे खेळ मुलींना स्वसंरक्षणासाठी आवश्‍यक आहेत. सिकई मार्शल आर्ट या क्रीडाप्रकारात प्राविण्य मिळवलेल्या मानसी राजेंद्र यादव या मुलीने राज्यस्तरावरील स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. मानसी यादवचे यश कौतुकास्पद असून तिने देशपातळीवर साताऱ्याचे नाव झळकवावे, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

लातूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट या स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींमध्ये 54 किलो वजनगटात साताऱ्यातील यशोदा शिक्षण संस्थेच्या साधना माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनी कु. मानसी राजेंद्र यादव हिने कांस्य पदक पटकावले. तिला विरभद्र कावडे, मनोज चव्हाण यांचे प्रशिक्षण लाभले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या यशाबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन ऍड. विक्रम पवार, सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद चव्हाण, बाळासाहेब चव्हाण सर, सोमनाथ गोडसे, अमर मोरे, राजेंद्र यादव, प्रथमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)