मानसीचा मराठी ‘बिग बॉस’ला नकार

नितीन देसाई यांच्या ‘फिल्म वर्ल्ड’ या थिम पार्कची ब्रॅंड अँबेसेडर असणारी मानसी नाईक मराठी बिग बॉसमध्ये झळकणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, आता खुद मानसीनेच या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तिने आपण बिग बॉसमध्ये नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या आपण बॉलीवूड डेब्यूची तयारी करत असल्याचे ती म्हणाली.

मानसी म्हणाली की, बिग बॉस मराठीसाठी मला कॉन्टेस्टन्ट म्हणून विचारण्यात आले होते. परंतु, ही ऑफर मी फेटाळली. आपले खासगी आयुष्य लोकांसमोर आणण्यात मला बिलकुल रुची नाही. मराठी बिग बॉसच होस्टिंग महेश मांजरेकर करणार आहेत. मानसी सध्या आपल्या बॉलीवूडच्या पहिल्या चित्रपटाकडे लक्ष केंद्रित करत आहे. चित्रपट निर्माते नितीन देसाई यांच्या आगामी हिंदी चित्रपटात मानसी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)