मानसिक, शारीरिक विकास महत्त्वाचा

आमदार भरणे : गोखळीत रंगल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा

रेडा- शिक्षण क्षेत्रासह इतर ठिकाणी स्पर्धात्मक वातावरण तयार झाले असून यामध्ये आपल्या मनाचा मानसिक विकास होतो; परंतु स्पर्धात्मक युगामध्ये मानसिक विकासाबरोबरच शारीरिक विकास गरजेचा आहे असे, मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर तालुक्‍यातील गोखळी येथील गुरूकुल विद्यामंदिर येथे 14 व 19 वर्षे वयोगटातील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा स्पर्धा रंगल्या. या क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन आमदार भरणे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस डॉ. शशिकांत तरंगे, इंदापूर नगर पालिकेचे गटनेते कैलास कदम, तालुका क्रीडा अधिकारी सुहास होनमाने, प्रो कबड्डी पट्टू सुलतानजी डांगे, युवक नेते शिवाजी तरंगे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रवीण माने म्हणाले की, खेळाडूंमधील चैतन्य निरंतर टिकण्यासाठी आत्मविश्‍वास, जिद्द व चिकाटी अशी मूल्ये असणे खूप गरजेचे असते. म्हणूनच खेळातील चैतन्य निरंतर राहिल, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या स्पर्धेत 19 वर्ष वयोगटातील मुलांचे 13 आणि मुलीचे 7 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी 14 वर्ष वयोगटातील मुलांचे एकूण 56 तर मुलींचे एकूण 27 झाले. या स्पर्धेचे आयोजक गुरुकुल विद्यामंदिर, गोखळीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब हरणावळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील क्रीडा शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले.

  • जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले संघ
    14 वर्षे (मुले) : जिजामाता इंग्लिश मेडियम स्कूल, सराटी, (मुली) जिजामाता मराठी माध्यम शाळा, सराटी, 19 वर्षे (मुले) : वालचंद विद्यालय, कळंब, (मुली) ज्युनिअर कॉलेज, सराटी.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)