मानसकन्या नमिता भट्टाचार्यकडून अटलजींच्या पार्थिवाला मुखाग्नी

नवी दिल्ली: भारतीय राजकारणातील ‘राजकीय योद्धा’ अटल बिहारी वाजपेयी अखेर आज अनंतात विलीन झाले. त्यांची मानस कन्या नमिता भट्टाचार्यने अटलजींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. अवघा जनसागर आज अटलजींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी दिल्लीत जमला होता. अटलजी अमर रहे! अशा अनेक घोषणा लोक देत होते. प्रेमळ, निस्वार्थी राजकारणी युगाचा आज अंत झाला.

माजी पंतप्रधान, राजकारणातील महाऋषी, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आज अनंतात विलीन झाले. संध्याकाळी पाचच्या सुमारास दिल्लीतील राजघाटावर राष्ट्रीय स्मृतिस्थळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, उपस्थित लोकांचे डोळे पाणावले होते. अवघ्या देशातील दिग्गज राजकारणी आज अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

अटलजींच्या पार्थिवाला मुखाग्नी देतांना नरेंद्र मोदी, सुमित्रा महाजन, लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या अश्रुधारा मोकळ्या केल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अटलजींना श्रद्धांजली वाहण्यात आली. अटलजींच्या कार्याचा प्रभाव देशातच नव्हे तर संपूर्ण जगात होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)