मानवी हक्क आयोगाकडे दाद मागता येते – न्या. बावनकर

कोल्हापूर – भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांच्या संदर्भाने भारतीय नागरिकाला उल्लघंनाचा अनुभव आला तर तो नागरिक मानवी हक्क आयोगाकडे दाद मागू शकतो, असे प्रतिपादन इचलकरंजीचे पहिले जिल्हा न्यायाधीश रविशंकर बावनकर यांनी केले

हातकणंगले तालुका विधी सेवा समिती, इचलकरंजी तर्फे आयोजित मानवी हक्क संदर्भातील जनजागृती शिबिरात न्या. बावनकर बोलत होते. भारतीय राज्यघटनेने भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या गरजेच्या मूलभूत गरजा असा उल्लेख करून त्यास स्थैर्य दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घटनेमध्ये स्वातंत्र्य हे कधीही एकतर्फी असत नाही, असा उल्लेख आहे. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने काम करताना सुद्धा कधी अतिरेक करायचा नसतो आणि असा अतिरेक झाला तर भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्या संदर्भाने मानवी हक्क आयोगाकडे दाद मागता येते. मानवी हक्क आयोगाचा अधिकार तुरुंगात राहणाऱ्या कैद्यानासुद्धा असतो, असे न्या. बावनकर यांनी सांगितले. या कार्यक्रमात ऍड. एस. एस. मुदगल यांनी प्रास्ताविक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)