मानवतेसाठी एक जात, एकच धर्म – सुरेश गोपी

पिंपरी : श्री नारायण गुरू समिती ट्रस्टच्या रजत महोत्सवी कार्यक्रमाचे उद्‌घाटन करताना खासदार सुरेश गोपी. यावेळी महापौर नितीन काळजे, सी. पी. राजु, विसुधानंद स्वामी व इतर मान्यवर.

पिंपरी – श्री नारायण गुरू महाराजांनी सांगितलेल्या मानवतेसाठी एक जात, एक धर्म, एक देव हा संदेशाचा प्रसार व प्रचार व्हावा, अशी अपेक्षा मल्याळी अभिनेते तथा खासदार सुरेश गोपी यांनी व्यक्त केली.

श्री नारायण गुरू समिती ट्रस्टच्या रजत महोत्सवी वर्ष निमित्ताने पिंपरीतील एच. ए. मैदानावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार अमर साबळे, मंत्रालयातील मुख्यमंत्री यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय, महापौर नितीन काळजे, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ उद्योगपती गोकुलम गोपालन, तळेगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष सुनील शेळके, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विलास मडेगिरी, समीर मासुळकर, शीतल शिंदे, बाबू नायर, माऊली थोरात, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, गुडविन ज्वेलर्सचे संचालक सुधीशकुमार, श्री नारायण धर्म संगम ट्रस्टचे अध्यक्ष ब्रह्मश्री विसुधानंद स्वामीकल, अद्वैदाश्रमचे मठाधिपती श्रीमद शिवस्वरुपानंद स्वामीकल, गुरू नारायण समितीचे अध्यक्ष गुलाब गोपीनाथ आदी उपस्थित होते.

-Ads-

यावेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधु सपकाळ यांना सेवारत्न पुरस्कार, एम. डी. श्रीनिवासन यांना प्रवासी रत्न, टीव्ही रघुनंदन यांना गुरूरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राजशेखरन पिल्ले व शरीर सौष्ठव प्रसाद कुमार यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सुरेश गोपी पुढे म्हणाले की, पुणे परिसरात नारायण गुरू समिती ही धार्मिक कार्यातून शैक्षणिक व आध्यात्मिक कार्य करीत आहे. सध्या ते मामुर्डी येथे भाड्याच्या जागेत शाळा चालवत आहे. खासदार साबळे यांच्यासह मुख्यमंत्री यांनी आपल्या निधीतून हातभार लावण्याची विनंती करणार आहे. ते जेवढी रक्कम देतील तेवढी रक्कम मी माझ्याकडून देईल, असे आश्वासन दिले.

श्रीकांत भारतीय म्हणाले की, आमचे सरकार खूपच संवेदनशील आहे. विकासासाठी तुम्ही एक पाऊल पुढे आले तर आम्ही दहा पाऊल पुढे येवून विकास साधतो. श्री नारायण गुरू समितीने कार्य करताना इतरांच्या विकासाचा विचार करीत आहे. राज्य सरकारकडून जी काही मदत लागल्यास आम्ही करू, असे आश्वासन दिले. तर विसुधानंद स्वामी म्हणाले की, गुरूदेव यांनी दिलेली शिकवण व साहित्य जगभर पसरत आहे. धार्मिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी समाज सेवा केली.

यावेळी सुमारे सात हजार मल्याळी बांधवांनी थरोत्सवम हा मल्याळम सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. अध्यक्ष गुलाब गोपीनाथ यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्रुती शशीधरण व विमल नारायण यांनी केले तर आभार के. पी. कुमार यांनी मानले. कार्यक्रम आयोजनासाठी गुलाब गोपीनाथ, सरचिटणीस सी. पी. राजु, खजिनदार पी. सुरेंद्र, के. पी कुमार, जे. चंद्रन यांनी पुढाकार घेतला.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)