मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म -राकेश मुटरेजा

रहाटणी – निरंकारी सद्‌गुरू माता सुदीक्षाजी महाराज संत निरंकारी सत्संग भवन, विजयनगर काळेवाडी येथे रविवारी सकाळी 10.30 ते 1.00 इंग्रजी माध्यम सत्संगामध्ये हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी उपस्थित होते. दिल्ली येथील युवा प्रचारक राकेश मुटरेजा यांनी तरुणांना मार्गदर्शनात सांगितले, मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. त्याचे पालन सर्वांनी केल्यास समाजातील विषमता, भेदभाव संपुष्टात येईल व मनुष्य सुखी-समाधानी जीवन जगू शकेल.

कार्यक्रमाला पुणे झोनमधून भोसरी, पुणे, आळेफाटा, नानगाव, पिंपरी-चिंचवड, दौंड, आव्हाळवाडी येथून युवक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. संत निरंकारी मिशनचा संदेश जगातील जवळजवळ 60 देशांमध्ये पोहचला आहे, म्हणूनच मिशनची ही प्रेमाची शिकवण संपूर्ण विश्वामध्ये पोहचवण्यासाठी इंग्रजी सत्संगाचे आयोजन केले होते.
मानवीय नितीमूल्यांपासून मनुष्य भरकटत चालला आहे. अशा वेळी आजच्या उच्च शिक्षित युवा पिढीला आध्यात्माची जोड मिळाली, तर नक्‍कीच तो कधी वाईट मार्गाला जाणार नाही. एक सुजान नागरीक बनवण्याची क्षमता केवळ आध्यात्मिक विचारांमध्ये आहे, म्हणून आजच्या युवकाला आध्यात्मिक सत्संग सोबत जोडणे फार गरजेचे आहे.
सत्संगामध्ये अनेक युवकांनी इंगजी भाषेला आधार घेऊन गीत, विचार, आध्यात्मिक प्रदर्शनातून संत निरंकारी मिशनचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी, पिंपरी सेक्‍टर प्रमुख गिरधारीलाल मतनानी यांनी भक्‍तांचे स्वागत व आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)