मानलेल्या भावानेच केला विवाहितेवर बलात्कार

लोणी काळभोर – रात्रीच्या वेळी घरात कुणी नसल्याचा फायदा घेत, तसेच चाकूने भोसकून जीवे मारण्याची धमकी देत मानलेल्या भावानेच एका विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना घडली असून, पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी दादा भीमा केसकर (वय 24, रा. कासुर्डी, ता. दौंड ) याला अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 9) रात्री अकरा वाजता फिर्यादी महिलेच्या घरात घडली. ही महिला आपल्या पती आणि दीड वर्षांच्या मुलासह येथे राहत आहे. या महिलेचे नातेवाईक दौंड तालुक्‍यातील कासुर्डी येथे आहेत. त्यांना भेटण्यासाठी महिला कासुर्डी येथे अधूनमधून जात होती, त्यामुळे तेथील दादा केसकर याच्याशी तिची ओळख झाली. तिने त्याला भाऊ मानले होते, त्यामुळे दादा केसकर अधूनमधून फिर्यादीच्या घरी येत होता.
शनिवारी (दि. 8) तिचे पती देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते, त्यामुळे ही महिला आणि तिचा दीड वर्षाचा मुलगा दोघेच घरी होते. रात्री जेवण करून हीमहिला झोपली होती, तेव्हा रात्री 11 च्या सुमारास दादा केसकर तिच्या घरी गेला. आणि चाकूने भोसकून ठार मारण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)