मानलेल्या बहिणीचे फोटो अश्‍लील साईटवर

पिंपरी – ज्या तरुणीने भाऊ मानले, तिचेच फोटो अश्‍लील साईटवर अपलोड करणाऱ्या तरुणावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाकड परिसरात घडली.

कामील शब्बीर मोहंमद (वय 32, रा. वाकड, मूळ रा. नागपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी 26 वर्षीय आयटी अभियंता तरुणीने फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी हिंजवडी येथील एका आयटी कंपनीमध्ये अभियंता पदावर नोकरीस आहे. आरोपी कामिल हा देखील अभियंता असून तरुणीचा मानलेला भाऊ आहे. तरुणी मागील दोन वर्षांपासून कामिलसोबत वाकड येथील तिच्या भावाकडे राहत होती. 15 जानेवारी रोजी कामिलने तरुणीला लग्नासाठी मागणी घातली. त्यावर तरुणीने स्पष्ट शब्दात नकार दिला. यामुळे चिडलेल्या कामिलने तरुणीचे खासगी फोटो एका ‘पॉर्न साईट’वर अपलोड केले. तसेच “तू टेंशन घे, बघ आता मी काय करू शकतो’ अशी धमकी दिली. आरोपीने फिर्यादी तरुणीचे इंस्टाग्राम आणि व्हाट्‌सअप अकाऊंट देखील ‘हॅक’केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)