मानपानासाठी विवाहितेचा छळ

पिंपरी – लग्नात मानपान न दिल्याच्या कारणावरून पती, सासू, सासरे आणि दीर यांनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार रहाटणीतील गजानननगर येथे घडला.

पूनम महावीर वाळके (वय-27, रा सहकार कॉलनी, ज्योतिबा नगर, काळेवाडी) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती महावीर रामदास वाळके (वय-28), सीमा रामदास वाळके (वय-45), रामदास सीताराम वाळके (वय-55), हनुमंत रामदास वाळके (वय-26, सर्व रा. गजानन नगर, रहाटणी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूनम व महावीर यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. परंतु लग्नामध्ये पूनम यांच्या आई-वडिलांनी महावीर याच्या आई-वडिलांना मानपान दिला नाही, त्यात त्यांना दोन मुली झाल्या या कारणावरून सासरची मंडळी त्यांचा छळ करीत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)