माननीयांचा सत्कार आता रोपटे-पुस्तक देऊन!

पिंपरी – महापालिकेच्या वतीने मान्यवरांच्या सत्कारासाठी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळाचा वापर केला जातो. परंतु, वर्षाकाठी या वस्तुखरेदीवर सुमारे 25 लाखांचा खर्च कला जातो. हा खर्च कमी करण्यासाठी यापुढील काळात पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळाऐवजी महापालिका उद्यान विभागातील रोपटे व पुस्तक व सन्मानचिन्ह भेट स्वरुपात दिले जाणार आहे. याशिवाय महापालिकेची मोठी डायरी छापली जाणार नसून, त्याऐवजी महापालिका अधिकारी व कार्यालयांचे फोन व मोबाईल नंबर असलेली छोटी पॉकेट डायरी छापली जाणार आहेत. महापालिकेवरील अनावश्‍यक खर्चाचा भार कमी करण्यासाठी हा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये मंजूर केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध मान्यवरांचे सत्कार केले जातात. यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी, विविध समित्यांचे सदस्य, पदाधिकारी नियुक्ती सत्कार, खेळाडूंचा सत्कार, पालिकेला भेट येणाऱ्या अतिथींच्या सत्कारासाठी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळाचा वापर केला जातो. परंतु, सत्कार केलेल्या फुलांचा फारसा उपयोग होत नाही. दोन दिवसात त्याचे कचऱ्यात रुपांतर होते. तसेच त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च देखील होत आहे. गेल्यावर्षी केवळ पुष्पगुच्छ खरेदीवर 25 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढील काळात महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या विविध सत्कार समारंभात पुष्पगुच्छ शाल, श्रीफळाचा वापर केला जाणार नाही. त्याऐवजी महापालिकेच्या नर्सरीत तयार झालेले रोपटे व उपयुक्त पुस्तक देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

ऐनवेळचा प्रस्ताव मंजूर…
याशिवाय महापालिका लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध दैनिकांचे वार्ताहर, शहराची माहिती असणारी डायरी छापली जाते. एका डायरीच्या छपाईकरिता 103 रुपये 50 पैसे एवढा खर्च येतो. त्यानुसार आठ हजार डायऱ्या छापण्यासाठी दहा लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे यापुढे मोठ्या आकारची डायरी छापण्यात येऊ नये. त्याऐवजी छोटी (पॉकेट) डायरी छापण्यात यावी, असा ऐनवेळचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)