दीपक मानकरांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे – मोक्‍काअंतर्गत कारवाई करण्यात आल्यांनंतर अटकेतील माजी उपमहापौर दीपक मानकर आणि त्यांच्या साथीदारांविरोधात हडपसर पोलिसांकडून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाकडून मानकर आणि साथीदारांनी 25 लाखांची खंडणी उकळण्यात आल्याची तक्रार देण्यात आली आहे. आतापर्यंत मानकरांविरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. बांधकाम व्यावसायिक अजय रामेश्वर अगरवाल (वय 53, रा. मुंबई) यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दीपक मानकर, बच्चूसिंग टाक, सुधाकर बेहडे, अमित बेहडे, यांच्यासह सातजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2003 मध्ये अगरवाल आणि बेहडे यांच्यात व्यावसायिक करार झाला होता. व्यावसायिक करार पूर्णत्वास गेला नाही. त्यानंतर अगरवाल आणि बेहडे यांच्यात आर्थिक देवाण-घेवाणीवरून वाद झाला होता. या व्यवहारात मध्यस्थी करण्याची विनंती बेहडेने मानकर यांना केली. त्यानंतर मानकर, बेहडे आणि साथीदारांनी अगरवाल यांना धमकावण्यास सुरुवात केली. अगरवाल यांना धमकावून त्यांच्याकडून 25 लाख रुपये उकळण्यात आले होते. दरम्यान, मानकर यांच्याविरोधात जमीन व्यवहारात कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अगरवाल यांनी सोमवारी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. मानकर यांच्याविरोधात यापूर्वी रास्ता पेठेतील जमिनीच्या वादातून सामाजिक कार्येकर्त जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यानंतर पुणे पोलिसांनी मानकरांविरोधात “मोक्‍का’अंतर्गत कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)