माध्यमिकसाठी 40 हजार पुस्तकांची खरेदी

21 लाखांचा खर्च : स्थायीच्या मान्यतेकरिता प्रस्ताव

पिंपरी – येत्या शैक्षणिक वर्षाकरिता महापालिका शिक्षण मंडळाच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता 21 लाख, 80 हजार, 436 रुपयांची 39 हजार 948 क्रमिक पाठ्यपुस्तके बालभारतीकडून थेट पद्धतीने खरेदी केली जाणार आहेत. हा पुस्तक खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतरही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता खरेदीचे सर्व अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. शिक्षण मंडळाच्या बरखास्तीनंतर अद्यापही शालेय शिक्षण समिती अस्तित्वात येऊ शकलेले नाही. ही बाब लक्षात घेत, शैक्षणिक वर्ष सुरु होत असताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण भासू नये, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत मराठी, इंग्रजी व उर्दु माध्यमासाठी ही पुस्तक खरेदी केली जाणार आहेत.

दरम्यान, शिक्षण समिती अस्तित्वात नसल्याने प्रजासत्ताक दिनी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप केल्या गेलेल्या बिस्कीट पुडा व पाण्याची बाटली खरेदीसाठी एकूण एक लाख दहा हजार रुपये खर्चास स्थायी समितीची मान्यता घेतली जाणार आहे. याअंतर्गत 26 जानेवारी 2018 रोजी भक्ति-शक्ति चौकात देशातील सर्वात मोठ्या उंचीच्या ध्वजाचे उद्‌घाटन व ध्वजारोहणाच्या दिवशी विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. याकरिता 27 हजार रुपये खर्च अला. तसेच याच दिवशी महापालिकेच्या मोरवाडी व कासारवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना 82 हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

69 जुन्या वाहनांचा लिलाव
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वापरात असलेली मात्र, मुदत संपलेल्या 69 जुन्या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. याकरिता आतापर्यंत तीन वेळा निविदा मागविण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत केलेल्या या निविदा प्रक्रियेत मे. रिलायन्स ऑक्‍शनर्स यांची निविदा प्राप्त झाली आहे. ही रक्कम आरटीओने विहित केलेल्या वाहनांच्या लिलावाच्या गोपनीय किंमतीच्या दोन टक्के अधिक रकमेची निविदा प्राप्त झाली आहे. हा दर स्वीकार करुन वर्षभराकरिता करार करणे व लिलावाद्वारे मिळणारे कमिशन देण्याचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.

महापालिका 54 हजार हेल्थकार्ड खरेदी करणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील हेल्थकार्ड तीन महिन्यांपुर्वीच संपली असून, रुग्णांना याचा फटका बसत आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकरिता महापालिका 54 हजार हेल्थकार्ड खरेदी करणार आहे. प्रति नग 15 रुपये दराने हे हेल्थकार्ड खरेदी केली जाणार आहेत. दरदिवश 300 हेल्थकार्डचा ठेकेदार पुरवठा करणार आहे. याकरिता 18 ऑगस्टपर्यंत दर दिवशी ही कार्ड खरेदी केली जाणार आहेत. ही कार्ड खरेदी करण्यासाठी येणाऱ्या आठ लाख दहा हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायीची मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)