माध्यमांवरील पोस्ट व्हायरल करण्यापूर्वी क्षणभर थांबा, विचार करा, सत्यता पडताळा मगच शेअर करा – विनायक पाचलग

कोल्हापूर : समाज माध्यमांवर एखादी माहिती, फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल करण्यापूर्वी क्षणभर थांबा, विचार व निरीक्षण करा, सत्यता पडताळा त्यांच्या परिणामांचा विचार करुनच समाज माध्यमावरील पोस्ट शेअर केल्यास फेक न्यूजच्या प्रचाराची गती रोखणे शक्य आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द सोशल मीडिया तज्ज्ञ श्री. विनायक पाचलग यांनी आज येथे केले.

जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हास्तरीय सायबर सेल आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेक न्यूज परिणाम आणि दक्षता’ या विषयावर पत्रकार व प्रसार माध्यमांसाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते, यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत, पोलीस उपअधिक्षक सतीश माने, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, , जिल्हा माहिती अधिकारी एस.आर.माने आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोशल मीडिया तज्ज्ञ विनायक पाचलग पुढे म्हणाले, देशामध्ये 27 टक्के इंटरनेट वापरण्याचे प्रमाण आहे, आणि हे प्रमाण आता झपाट्याने वाढत आहे. याअंतर्गंत देशातील 22 कोटी लोक फेसबुक तर 17 कोटी जनता व्हॉट्अपचा वापर करतात. समाजकंटक आपला हेतू साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांचा वापर करतात. समाज माध्यमे वापरणारी व्यक्ती शक्यतो समाज माध्यमांवर येणाऱ्या पोस्टची सत्यता पडताळत नाहीत. त्यामुळे समाजात संभ्रमाची अवस्था निर्माण होते. यावर उपाय म्हणून सोशल मीडियाचा वापर करताना थिंक व्टॉईस हा मंत्र अवंलबणे उपयुक्त ठरु शकते. प्रत्येकाने आपआपल्या परीने आपआपल्या कार्यक्षेत्रात मेसेज फॉरवर्ड करताना. क्षणभर थांबा, विचार करा मगच शेअर करा हे सुत्र जोपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

पत्रकार तसेच प्रसार माध्यमांबरोबरच समाजातील प्रत्येक घटकांने समाज माध्यमात चांगले पर्याय उभे करणे काळाची गरज असल्याचे सांगून सोशल मीडिया तज्ज्ञ श्री. विनायक पाचलग म्हणाले, फेसबुक, whats ap, ट्विटर अशा समाज माध्यमात चांगले पर्याय उभे केल्या शिवाय वाईट पर्याय दूर होणार नाहीत. फेकन्यूजच्या वाढत चाललेल्या थैमानाला आळा घाल्यासाठी प्रत्येकानेच विचारपूर्वक पोस्ट व्हायरल करावी. एखादी पोस्ट खरी-खोटी कशी ओळखायची याबाबतच्या चार महत्वाच्या टुल्सची त्यांनी सविस्तरपणे माहिती करुन दिली. याबरोबरच समाजातील सर्वच थरातील लोकांनी समाजातील डॉक्टर, वकील, सी.ए. आदींचा ग्रुप तयार करावा आणि समाज माध्यमांवरील येणाऱ्या पोस्टची त्या-त्या क्षेत्रातील मान्यवरांकडुन सत्यता पडताळावी, जेणे करुन फेकन्यूजला रोखणे शक्य होईल.

फेक न्यूज हे अफवा पसरविण्याचे सूत्र बनले आहे. खरे काय आणि खोटे काय याचा फरक सध्याच्या व्हायरल जमान्यात ओळखायलाच हवा. या व्हायरल जमान्यात प्रसार माध्यमांची विश्वासार्हता टिकून आहे. त्यामुळे पत्रकार आणि प्रसार माध्यमांची जबाबदारी वाढली असून प्रत्येकांनेच समाज माध्यमांवरील फेकन्यूज रोखण्यासाठी सक्रीय व्हावे, असे आवाहनही सोशल मीडिया तज्ज्ञ श्री. विनायक पाचलग यांनी केले.

फेक न्यूज वेळीच रोखणे गरजेचे- माहिती उपसंचालक सतीश लळीत
कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत याप्रसंगी बोलताना म्हणाले, सामाजिक सलोखा नष्ट करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या फेक न्यूजचा शोध घेवून त्यांना वेळीच रोखणे गरजेचे आहे. समाज माध्यमांवरील फेकन्यूज रोखणे जरी अवघड असले, तरीही त्या शेअर न करणे शक्य आहे. याप्रसंगी त्यांनी समाज माध्यमावरील शेअर होणाऱ्या फेकन्यूजच्या पोस्टची पॉवर पॉईंट सादरीकरणाव्दारे उपस्थितांना सहज व सोप्या पध्दतीने उदाहरणांसह माहिती करुन दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)