माधुरीसोबत डान्स करण्यासाठी आलियाची जोरदार तयारी

आलिया भट्‌ट आणि वरूण धवन यांची जोडी पुन्हा एकदा करण जोहरच्या “कलंक’ या चित्रपटात झळकणार आहे. यात आलियासोबत माधुरी दिक्षितही मुख्य भूमिका साकारणार आहे. यात आलिया आणि माधुरीचे एक क्‍लासिकल गाणेही चित्रित करण्यात येणार असून, यात दोघी कथक नृत्य करणार आहेत.

आलियासाठी हे टास्क थोडे अवघड आहे. कारण माधुरी ही ट्रेन्ड कथक डान्सर आहे, तर या डान्सबद्‌दल आलियाला काहीच माहिती नाही. यासाठी कथक शिकण्यासाठी आलिया खूपच परिश्रम घेत आहे.
“कलंक’मधील या क्‍लासिकल गाण्यावर माधुरीसोबत कथक नृत्य करण्यासाठी आलिया सध्या दररोज कथकच्या विविध मुद्रा शिकत आहे. तसेच आलियाला पंडित बिरजू महाराज यांच्याकडूनही कथकमधील बारकावे शिकण्याची संधी मिळणार आहे. यामुळे ती माधुरीसोबत डान्स करण्यास सज्ज होईल.

दरम्यान, करण जोहरच्या आगामी “कलंक’मध्ये आलिया भट्‌ट, वरूण धवन, संजय दत्त, माधुरी दिक्षित, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा आदी स्टार कलकार एकत्रित काम करणार आहेत. या चित्रपटाची जोरदार तयारी सुरू असून हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)