माधुरीच्या नखाचीही सर जॅकलीनला नाही

हल्ली जुनी गाणी नव्या स्वरुपात नवीन सिनेमांमध्ये घेण्याचा फंडा रूढ झाला आहे. त्याच प्रमाणे “बागी 2’मध्ये “तेजाब’मधील सुपरहिट “1,2,3…’ हे गाणेही नवीन स्वरुपात घेण्यात आले आहे. माधुरीच्या पदार्पणाच्या या गाण्याला प्रेक्षकांनी किती पसंती दिली होती, हे वेगळे सांगायला नको. तब्बल एक दशक या गाण्याने आणि माधुरीच्या घायल करणाऱ्या अदांनी सिनेरसिकांना वेड लावले होते. आता “बागी 2′ मध्ये माधुरीच्या जागेवर जॅकलीन फर्नांडिस “1,2,3…’वर थिरकताना दिसणार आहे.
या गाण्याच्या नवीन व्हर्जनच्या ट्रॅकला “तेजाब’चे डायरेक्‍टर एन.चंद्रा यांची पसंती मिळेल, असा “बागी 2’च्या निर्मात्यांचा अंदाज होता. पण झाले उलटेच. चंद्रा जे भडकले की विचारता सोय नाही.

या गाण्याचा रिमेक जेंव्हा एन. चंद्रा यांनी बघितला तेंव्हा ते चांगलेच भडकले. “या चांगल्या गाण्याचे हे काय करून टाकले आहे ? हे काय गाणे आहे. हे तर केवळ सेक्‍स ऍक्‍ट आहे.’ अशा शब्दामध्ये चंद्रा यांनी आपली तीव्र नापसंती दर्शवली.

या गाण्याला काय म्हणायचे. हे काय केले आहे, यावर माझा विश्‍वासच बसत नाही. माधुरीच्या गाण्यावर जॅकलीनचा नाच…..! याची तर कल्पनाही करता येत नाही. हे म्हणजे सेंट्रल पार्कमधून बोटॅनिकल गार्डनमध्ये गेल्यासारखे झाले. माधुरीने ज्या ग्रेस आणि इनोसेन्समधून या गाण्यावर डान्स केला होता. तो तर जॅकलीनकडे अजिबातच नाही. जॅकलीनचा डान्स म्हणजे केवळ सेक्‍स ऍक्‍टच वाटतो आहे. सरोज खानची मूळ कोरिओग्राफी असलेल्या स्टॅप्स केवळ फॉलो केल्या म्हणजे ओरिजिनॅलिटी नाही, अशा शब्दात एन. चंद्रांनी आपला राग व्यक्‍त केला आहे. ही स्तुतीसुमने जॅकलीनपर्यंत अद्याप पोहोचली नसतील, अशी आशा करूयात. जर जॅकलीनला हे सगळे समजले तर ती पुन्हा कोणत्याच गाण्याच्या रिमेकमध्ये काम करणार नाही. जॅकलीन स्वतः माधुरीची हार्डकोअर फॅन आहे. तिने माधुरीच्या गाण्यावरचा आपला परफॉर्मन्स म्हणजे माधुरीला सॅल्युट असेल, असे म्हटले होते. आता ती काय म्हणणार बिच्चारी….!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)