माधुरी’चं ‘सॉरी’ गाणं लॉंच

मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित, स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माधुरी’ या चित्रपटाची पत्रकार परिषद नुकतीच पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत निर्माते मोहसिन अख्तर, प्रेझेंटर उर्मिला मातोंडकर, संगीतकार अवधूत गुप्ते, गायक स्वप्नील बांदोडकर, कलाकार सोनाली कुलकर्णी, संहिता जोशी, अक्षय केळकर, विराजस कुलकर्णी आणि या चित्रपटाचे लेखक समीर अरोरा उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत पत्रकारांना या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला. सोनाली कुलकर्णीने साकारलेली एका तरुणीची भूमिका, सध्या तरुण पिढीवर उद्भवणारे अनेक चांगले आणि वाईट प्रसंग, आणि त्या प्रसंगांना त्यांनी कसे सामोरे जाऊन त्याचे कशाप्रकारे निरसन करावे हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. तसेच सोनाली कुलकर्णी, शरद केळकर, संहिता जोशी, अक्षय केळकर आणि विराजस कुलकर्णी यांच्या पात्रांची झलक देखील ट्रेलरमध्ये पाहू शकतो. पत्रकारांनी या ट्रेलरला पसंती दर्शवून या चित्रपटाच्या टीमशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. चित्रपटा दरम्यान घडलेले अनेक किस्से पत्रकारांनी जाणून घेतले.

या पत्रकार परिषदते घडलेली आणखी एक खास गोष्ट म्हणजे या चित्रपटातील अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील ‘सॉरी’ हे गाणं पुण्यातील पत्रकारांच्या उपस्थित प्रदर्शित करण्यात आले. या गाण्यासाठी घेतलेली खास मेहनत आणि सॉरी म्हणताना नेमक्या काय भावना मनात असतात हे गाण्यातून मांडतानाचा अनुभव याविषयी पत्रकारांसोबत गप्पा रंगल्या.

मुंबापुरी प्रॉडक्शन आणि मोहसिन अख्तर यांचा पहिला मराठी चित्रपट, सोनाली कुलकर्णीचा हटके लूक, संपूर्ण स्टारकास्टचा तगडा अभिनय या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असा ‘माधुरी’ चित्रपट ३० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)