मादाम तुसाँ संग्रहालयात अनुष्काचा बोलका पुतळा

मादाम तुसाँ संग्रहालयातील बॉलिवूड विभाग जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे. या विभागात कोणत्या बॉलिवूड कलाकाराची वर्णी लागणार याबद्दल लोकांना उत्सुकता असतेच पण, कलाकारही त्या संधीची वाट पहात असतात. सिंगापूरमधील मादाम तुसाँ संग्रहालयात अभिनेत्री अनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे हा पुतळा चाहत्यांसोबत गप्पाही मारणार आहे. तुम्हीही झालात ना थक्क? अनुष्काचा हा पुतळा बोलका असणार आहे आणि अशा प्रकारचा पुतळा सिंगापूरच्या संग्रहालयात असणारी अनुष्का ही भारतातील पहिली सेलिब्रिटी आहे.

मादाम तुसाँ संग्रहालयात मोजक्याच लोकांच्या पुतळ्यावर इंटरॅक्टिव्ह फीचरचा प्रयोग केला जातो. फुटबॉलपटू रोनाल्डो, ओपरा विन्फ्रे आणि लुईस हॅमिल्टन यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींसोबत आता अनुष्का शर्माचा बोलका मेणाचा पुतळा या संग्रहालयात असणार आहे.

अनुष्काच्या या पुतळ्यासोबत चाहते सेल्फीसुद्धा काढू शकणार आहेत. अनुष्काच्या हातात फोन असलेला हा पुतळा असून जेव्हा तो फोन उचलला जाणार तेव्हा तिचा आवाज ऐकू येणार आहे. या संग्रहालयाची टीम लवकरच पुतळ्यासाठी मोजमाप घेणे, पोज ठरवणे अशा तांत्रिक गोष्टी टिपून घेण्यासाठी अनुष्काशी संपर्क साधणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)