माथेफिरू युवकाकडून तरुणीवर तलवारीने वार

इस्लामपूर – एकतर्फी प्रेमातून एका 21 वर्षीय माथेफिरू युवकाने संबंधित मुलीच्या घरात घुसून तलवारीने हल्ला चढवला. यामध्ये या 21 वर्षीय युवती गंभीर जखमी झाली, तर तिचा भाऊही या हल्ल्यात जखमी झाला. शनिवारी रात्री 8 च्या सुमारास ताकारी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

ऐश्वर्या प्रकाश पवार (21) आणि अश्विन प्रकाश पवार (19) अशी जखमी बहीण भावाची नावे आहेत. ऐश्वर्यावर कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असून, ती अद्याप बेशुद्धावस्थेत आहे. अश्विन याला उपचारानंतर घरी सोडले आहे. ऐश्वर्या ही इस्लामपूर येथील महाविद्यालयात शास्त्र शाखेच्या पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे.याबाबतची माहिती अशी, हल्लेखोर शुभम राजेंद्र पवार (21) हा गेल्या दोन वर्षांपासून ऐश्वर्याला त्रास देत आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाल्याचे समजते. मात्र तरीही त्याने ऐश्वर्याला त्रास देणे थांबवले नव्हते.

-Ads-

ऐश्वर्या ही आपली आजी, आजोबा, आई व दोन लहान भावांसमवेत राहते. तिचे वडील प्रकाश पवार हे कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास असतात. हल्लेखोर पवार हा शनिवारी रात्री तलवार हातात घेऊन थेट त्यांच्या घरात घुसला व तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत त्याने अश्विनच्या डोक्‍यात आणि कमरेवर वार केले. यादरम्यान ऐश्वर्या व आजीमध्ये पडल्यावर, आजीला ढकलून शुभम पवार याने थेट ऐश्वर्याच्या डोक्‍यात तलवारीचा वार केला. यामध्ये ती रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. यानंतर आरडाओरडा झाल्याने शेजारी धावत आले. त्यांना पाहून शुभम पवार याने तलवार आणि चाकू तेथेच टाकून पलायन केले. हल्लेखोर शुभम पवार याच्याविरुद्ध, खुनाचा प्रयत्न करणे, प्राणघातक हत्यारे बेकायदेशीरपणे बाळगणे अशा कलमांखाली गुन्हा नोंद झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)