माथाडी मंडळाचे विलिनीकरण करणार नाही

– कामगारमंत्री निलंगेकर यांचे संघटनांना आश्‍वासन

पुणे, राज्यातील माथाडी मंडळाचे विलिनीकरण करण्यात येणार नाही, असे आश्‍वासन राज्याचे कामगारमंत्री संभाजीराव निलंगेकर यांनी मुंबई येथे विविध संघटनांना सांगितले. माथाडी मंडळाच्या विलिनीकरणाबाबतचा आदेश नुकताच राज्य शासानाने काढला होता.

-Ads-

राज्य शासनाच्या या आदेशाला राज्यातील माथाडी मंडळानी विरोध केला होता. हा विरोध करताना त्यांनी एक दिवसांचा संपही पुकारला होता. यासंदर्भात आज माथाडी मंडळाचे सदस्य आणि कामगार मंत्री निलंगेकर यांच्यात मुंबई येथे मंत्रालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, आमदार भाई जगताप, शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, बळवंतराव पवार, राजकुमार घायाळ इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत या विलीनकरणामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर कोणत्याही स्वरुपाचा बोजा पडणार नसल्यामुळे हा आदेश मागे घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच माथाडी मंडळाचा कारभार सुधारला पाहिजे, यासाठी सरकारनेसुद्धा मदत केली पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)