माथाडी कायदा रद्द करण्याचा डाव हाणून पाडू

इरफान सय्यद : अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन

चिंचवड – काबाड कष्ट, अंग मेहनतीने काम करणाऱ्या असंघटीत माथाडी हमाल कामगारांना योग्य न्याय मिळावा. त्यांचे जीवन सुखकर व्हावे याकरिता माथाडींचे दैवत अण्णासाहेब पाटील यांनी संघर्ष करुन या घटकाला स्थैर्य मिळवून दिले. त्यांना सन्माना जगायला शिकविले. माथाडी कामगारांसाठी कायदा केला. परंतु, विद्यमान राज्यकर्ते माथाडी कायदा रद्द करण्याचा कुटील डाव रचत आहे. हा डाव हाणून पाडू, असा इशारा महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांनी दिला.

महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंचवड, केएसबी चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास इरफान सय्यद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी सय्यद बोलत होते. यावेळी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

महाराष्ट्र मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष किसन बावकर, ज्ञानोबा मुजुमले, खंडू गवळी, मुरलीधर कदम, कार्याध्यक्ष परेश मोरे, सरचिटणीस प्रवीण जाधव, सचिव भिवजी वाटेकर, सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, सल्लागार बाळासाहेब शिंदे, बांगर मामा, शंकर मदने, गोरक्ष दुबाले, राजेंद्र तापकीर, सतीश कंठाळे, हनुमंत शिंदे, प्रकाश पवार, अशोक साळुंखे आदी उपस्थित होते.

इरफान सय्यद म्हणाले, अण्णासाहेबांनी माथाडी कामगारांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी दीपस्तंभासारखे कार्य केले आहे. परंतु, सध्याचे राज्य सरकार हे माथाडी कामगारांच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करत आहे. माथाडी कामगार कायदा रद्द करण्याचा विचार करत आहे. माथाडी मंडळ व कामगारांच्या प्रश्नांकडे वारंवार पाठपुरावा करुन त्याची दखल घेतली जात नाही. दुर्लक्ष केले जात आहे. 17 जानेवारी, 2018 रोजी शासनाने काढलेल्या अद्यादेशाविरोधात 30 जानेवारी, 2018 रोजी कामगारांच्या वतीने राज्यभरात बंद पुकारण्यात आला. या संपात राज्यातील सर्व कामगार एकत्र आले होते. माथाडी कायदा वाचवण्यासाठी कोणतीही संघटना, नेता, पक्ष न पाहता केवळ कामगार म्हणून एकत्र येऊन कामगार कायद्याचा लढा न्याय मिळेपर्यंत सुरु ठेवणे हीच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली असेल, असेही सय्यद म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)