मातृभूमीला कधीही विसरू नका : माल्टातील भारतीय समुदायाला उपराष्ट्रपतींचे आवाहन

वाल्लेत्ता, (माल्टा) – परदेशात राहणारा भारतीय समुदाय देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करत आहे आणि ज्या देशात ते राहतात त्या देशासाठी आणि आपल्या मातृभूमीसाठी भरीव योगदान देत आहेत असे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

-Ads-

माल्टाची राजधानी वाल्लेत्ता येथे माल्टातील भारतीय उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या भारतीय समुदायाच्या स्वागत समारंभाला ते संबोधित करत होते. अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्‍ला, माल्टातील भारतीय उच्चायुक्त राजेश वैष्णव आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उभारी घेतलेला भारत देश कायम भारतीय वंशाच्या लोकांबरोबर राहील असे सांगून तुमची उत्तम जडणघडण केलेल्या मातृभूमीला कधीही विसरू नका असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले. कला, संस्कृती , नीतिमूल्ये आणि परंपरामधील भारताचा संदेश जगभरात पोहचवण्यासाठी भारतीय समुदायाची भूमिका महत्वाची आहे असे ते म्हणाले.

भारत आणि माल्टा मधील संबंध दृढ करण्याच्या गरजेवर भर देत ते म्हणाले की छोटा देश असूनही माल्टाने चांगला विकास केला आहे आणि भारत आणि माल्टा यांच्यात दीर्घकालीन संबंध निर्माण होऊ शकतात. देशाचा आकार नव्हे तर विकास महत्वाचा आहे असे ते म्हणाले.

भारतीय सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतात आणि जगभरातील समाजाबरोबर त्यांनी एकोप्याचे संबंध निर्माण केले आहेत. भौगोलिक सीमा भारत आणि माल्टाला वेगळे करत नाहीत असे ते म्हणाले.

भारताच्या विकासाबाबत उपराष्ट्रपती म्हणाले की देशात स्थिर विकास असून सरकारच्या योग्य सुधारणा कार्यक्रमामुळे सर्वसमावेशक समाज निर्माण होत आहे. भारताला अधिकृत अर्थव्यवस्था बनवण्याचे प्रयत्न जोमाने सुरु असल्याचे ते म्हणाले.
डिजिटल अर्थव्यवस्था, आर्थिक समावेशकता, जीएसटी, जनधन यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत क्रांतिकारी परिवर्तन घडून आल्याचे ते म्हणाले. महत्वाकांक्षी आयुष्मान भारत कार्यक्रमामुळे देशातील आरोग्यसेवा यंत्रणेत बदल होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)