मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून दोन मजूर ठार

रांजणवाडीतील घटना : संरक्षक भिंतीचे काम करताना भराव ढासळला

महाबळेश्‍वर, दि. 15 (प्रतिनिधी) – येथून दोन किमी अंतरावर रांजणवाडी मोहल्ल्यात इमारतीशेजारी आठ फुट उंच संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असताना मातीचा भराव कोसळून दोन मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जावून जागीच ठार झाले तर एकजण बचावला. दस्तगीर अब्दुल दिड्‌डी वय 44 व त्यांचे जावई मुस्तफा दस्तगीर बल्लोरगी वय 24 रा. मलगान, ता. सिंदगीख जि. विजापूर अशी मृतांची नावे आहेत.
विजापूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कामगार महाबळेश्‍वर तालुक्‍यात खुदाईचे काम करतात. संबंधित कामगारांचे कुटूंब पाचगणीजवळ गोडवली येथे एकत्र रहात आहेत. शशी नावाचा ठेकेदार या कामगरांना बांधकामावर लावतो. राजंणवाडीत बांधकामावर शशी यांनीच कामगार पुरवले होते. येथे एका घराशेजारी संरक्षण भिंतीचे काम चार दिवसांपासून सुरू होते. सात ते आठ फुट खोल मातीचे खोदकाम केल्यानंतर तेथे लोखंडी सळ्या जोडण्याचे काम सुरू होते. दुपारी कामावर असेलल्या तीन कामगारांनी जेवण केले व पुन्हा कामाला सुरूवात केली. पाच ते दहा मिनिटांनी आठ फुट उंच मातीचा ढिगारा अचानक कामगारांच्या अंगावर कोसळला. यामध्ये सासरे व त्यांचे जावई हे दोघे कामगार पुर्णपणे गाडले गेले. एक कामगार सुदैवाने बचावला. या कामगारांने दोन कामगारांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. मोठा ढिगारा असल्याने बाहेर काढण्यास विलंब झाला. त्यांना बाहेर काढुन तातडीने येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्‍टरांनी दोन्ही कामगार ठार झाल्याचे सांगितले. दरम्यान, कामगारांचा मृत्यु झाल्याचे समजताच नातेवाईक मोठया संख्येने रूग्णालयात दाखल झाले. दोघेही ठार झाल्याचे समजताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेची नोंद महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात घटनेची झाली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)