मातीचा गणपती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात

रेडा- “आपला गणपती आपणच बनवू’ या उपक्रमाअंतर्गत श्री छत्रपती हायस्कुल सणसर (ता. इंदापूर) येथे शरयु फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांसाठीची कार्यशाळा पार पडली. यावेळी विद्यालयातील 160 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्वतः बनविलेल्या गणेश मूर्ती बनविल्या. दरम्यान, गणेश उत्सवात बीया रूजवून मातीने भरलेल्या कुंडीमध्ये गणेशमूर्तीची स्थापना घरी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या मूर्तीचे विसर्जनही कुंडीत केले जाणार आहे. तर त्यातून उगवलेल्या रोपट्याचे संगोपन करीत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीमुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळून पर्यावरण रक्षण करण्याचा निर्धार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. सर्जे, शिवाजी काळे, राजेंद्रसिंह निंबाळकर, अनिल काटे, सुभाष शिंदे, ऍड. तेजसिंह पाटील यांच्यासह ामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणदिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षकांचा सत्कार शर्मिला पवार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रशिक्षक व कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी दीपक कुंभार, सिमरन तांबोळी, श्रीराम सावंत, रविंद्र खवळे, परशुराम घाडगे यांनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)