माता रमाबाई आंबेडकर पुतळ्याचे राष्ट्रपतींच्या हस्ते होणार अनावरण

पुणे – महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यावेळी उपस्थित होते.
वाडिया महाविद्यालयासमोरील मातोश्री रमाई आंबेडकर उद्यानात बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

माता रमाबाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने साडे नऊ फूट उंचीचा रमाबाईंचा पुतळा बसवण्यात आला आहे. रमाबाईंचा देशातील हा पहिलाच पुतळा आहे. गनमेटल धातूपासून हा पुतळा घडवण्यात आला असून, याला “महाराष्ट्र कला संचालनालया’चे ना हरकत प्रमाणपत्रही तीन फेब्रुवारी 2015 रोजी मिळाले आहे.

मातोश्री यांची रमाबाई या सुशील, चारित्र्यवान, कष्टाळू आणि कणखर व्यक्तिमत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात रमामाई यांची मायेचे, आधराची साथ होती. समाजाला अस्पृश्‍यतेतून मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी अर्धपोटी उपाशी राहून 18-18 तास अभ्यास केला. त्यावेळी आपल्या निष्ठेने, त्यागाने व कष्टाने रमामाईंनी संसाराचा गाडा हाकून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. तीस वर्षांच्या संसारात बाबासाहेबांना प्रेमाने आणि धैर्याने सोबत देणाऱ्या रमाबाई या 27 मे 1935 रोजी निवर्तल्या.

बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. “थॉटस ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या प्रिय पत्नीला अर्पण केला. त्यात त्यांनी रमाबाईंविषयीचे प्रेम, त्यांचा त्याग व्यक्त केला आहे.
हा पुतळा उभारण्यासाठी या परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी स्वर्गीय नवनाथ कांबळे, माजी नगरसेवक बाबू वागस्कर, माजी नगरसेविका वनिता वागस्कर, विद्यमान स्थानिक नगरसेविका लता राजगुरू, नगरसेविका हिमाली कांबळे, नगरसेविका लता धायरकर, नगरसेविका मंगला मंत्री यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)