“शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी’

भोसरी  – प्रत्येक माता-पिताची इच्छा असते की, आपल्या पुत्र-पुत्रीने आपल्या कुटुुंबाचे नाव लौकिक करावे. काही माता-पित्यांच्या नशिबी करंटी मुले जन्माला येतात. त्यांना उजळमाथ्याने समाजात वावरता येत नाही, असे का? तर याचे उत्तर संत तुकाराम महाराजांनी एका वाक्‍यात दिले आहे. ते म्हणतात “शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी’ याचा अर्थ असा की, माता-पित्यांच्या कर्माप्रमाणे पुत्र-पुत्री प्राप्त होते, असे प्रतिपादन साध्वी मंजुलज्योतिजी म.सा. यांनी आपल्या दैनंदिन प्रवचना दरम्यान केले.

भोसरी येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन संघामध्ये आयोजित चातुर्मास प्रवचना दरम्यान त्या म्हणाल्या की, धर्मशास्त्रांमध्ये तीन प्रकारची संताने जन्माला येतात. त्यात पहिला प्रकार म्हणजे कुलश्रृंगार- या प्रकारामध्ये जन्मणाऱ्या बालकाच्या नावावरुन आई-वडिलांना ओळखले जाते. मुलांच्या नावाने त्यांच्या कुळाची ओळख होते. उदाहरणार्थ भगवान महावीर- त्रिशलानंद, भगवान श्रीकृष्ण- वसुदेव-देवकी, प्रभू श्रीराम- राजा दशरथ आई कौशल्या यांच्या नावाने ओळख माता-पित्यांना मिळते. याचा अर्थ माता-पित्याला मुलांच्या नावाने ओळखले जाते.
दुसरा प्रकार म्हणजे कुल आगार- या प्रकारात आपल्या कुटुंबाचे नाव लौकिक वाढविणारा पुत्र जन्माला येतो. कुटुंबाची वाड-वडिलांची इज्जत कशी वाढेल. ती कशी टिकवली जाईल त्याप्रमाणे आचरण करणारी संतान असते. उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद, पं. लालबहादूर शास्त्री आदी उदाहरणे प्रसिद्ध आहेत. या महान व्यक्‍तींमुळे कुटुंबाची ओळख निर्माण होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिसरा प्रकार म्हणजे कुल अंगार- या प्रकारामध्ये अंगार म्हणजे राख-रांगोळी करणारी संताने असतात. कुटुंबाच्या नावाची पूर्ण खराबी या संतानाच वर्तणुकीतून होते. माता-पिता उजळ माथ्याने वावरु शकत नाहीत. पूर्ण कुटुंब यांच्यामुळे बदनाम होते.

जयंती महोत्सवाचा दुसरा दिवस तप आराधनेचा
आचार्य आनंदऋषिजी महाराजांच्या जन्म जयंती सप्ताहातंर्गत दुसऱ्या दिवशी सामुयिक एकासना तप आराधना केली जाणार आहे. या तप महोत्सवाचे नियोजन उप प्रर्वतनी साध्वी श्री मंजुलज्योतिजी म.सा. यांच्या नेतृत्त्वाखाली ओजस्वी वक्‍त्या साध्वी वसुधाजी म.सा., साध्वी श्री वंदिताजी म.सा, साध्वी विजेताजी म.सा., विद्याभिलाषी साध्वी वारिधीजी म.सा. यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे. गौतमप्रसादीचा लाभ रविंद्रजी कटारिया परिवाराने घेतला आहे. या तप महोत्सवात जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या अध्यक्ष सुभाष चुत्तर, शांतीलाल साळ, गिरीश मुथियान, सागर सांकला, राजेंद्र चोरडिया, मफतलाल कर्नावट, भागचंद गुगळे, संजय भंडारी, अमृतलाल डुंगरवाल, प्रकाश लुंकड, देवीचंद धोका, खुशाल बोरा, मनोज गांधी, प्रमोद चुत्तर, मनोज गुंदेचा आदींनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)