माता-पित्यांचा आशीर्वाद हा सर्वश्रेष्ठ!

पं. ठाकूर भारतभूषण : श्रीमद्‌ भागवत कथा सोहळा

चिंचवड – आजकाल घरात प्राणी पाळतात. हजारो रुपये खर्च करून प्राण्यांची देखभाल करतील पण जन्मदात्या आई- वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले जात आहे, असे चित्र समाजात दिसत आहे. म्हणजेच समाजातील काही युवकांना आई-वडिलांपेक्षा प्राणी प्रिय झाले ही शोकांतिका आहे. मात्र हे युवक हे विसरले की माता-पित्यांचा आशीर्वाद हा देवांच्या आशीर्वादापेक्षा श्रेष्ठ असतो, असे प्रतिपादन पंडित ठाकूर भारतभूषण यांनी केले.

शाहूनगर येथे श्री साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त श्री साई मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित श्रीमद्‌ भागवत कथा सोहळ्यात पंडित ठाकूर भारतभूषण बोलत होते. यावेळी आयोजक सुप्रिया चांदगुडे, टी. एन. तिवारी, भगवान मुळे, संगीता गोडगे, उद्योजक भगवान पठारे, संजय जगताप आदी उपस्थित होते.

पंडित भारतभूषण महाराज पुढे म्हणाले, ज्या मुलांसाठी आई-वडील काबाडकष्ट करून आपल्या मुलांना मोठे करतात. उच्च शिक्षण देवून नोकरीला लावतात. हे युवक आई-वडिलांचे उपकार विसरतात. त्यांना प्रणाम तर सोडाच त्यांच्याशी साधे संभाषण देखील करीत नाही. आई-वडिलांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा आहे. देव मंदिरात नाही आई-वडिलांच्या रूपात देव आहे. त्यांची पूजा केली पाहिजे. आई-वडिलांची दुर्दशा करण्याचा जो प्रयत्न करतो तो कधीच सुखी होत नाही, असे सांगून पुढे ते म्हणाले की, गोमातेच्या ठायी 33 कोटी नव्हे तर 33 प्रकारच्या देवांचे वास्तव्य आहे. त्यामुळे गोमातेची देखील सेवा करण्याचा सल्ला दिला.

कथा श्रवण करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)