मातंग समाजाचा बारामतीत मोर्चा

माळेगाव- बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्‍यातील इसरुळ या गावमध्ये झालेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ बारामती शहर व तालुका मातंग समाजाच्या वतीने आज (सोमवारी) मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
अण्णाभाऊ साठे चौक कसबा येथून अण्णाभाऊ साठे यांच्या चौकास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा शहारातून मार्गक्रमण करीत हा मोर्चा भिगवण चौकामध्ये नागरपरिषदेसमोर या मोर्चाचे रूपांतर निषेध सभेमध्ये झाले. इसरुळ येथील उखडून काढलेला अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा शासनाने पुन्हा बसवावा, लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक काळेगावकर व त्यामध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यामध्ये मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. आशा मागण्या घेऊन मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणातून निषेध व्यक्‍त केला. यामध्ये लहुजी शक्‍ती सेनेचे पुणे जिल्हा सचिव लक्ष्मण मांढरे, पुणे जिल्हा अध्यक्ष मस्कु शेंडगे, युवक अध्यक्ष पप्पू भिसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती युवक कार्याध्यक्ष विशाल जाधव, माजी उपनगराध्यक्ष विजय खरात, माजी नगरसेविका आरती शेंडगे, अँड. अमृत नेटके, क्रांतिवीर लहुजी शक्‍ती सेनेचे संपर्क प्रमुख सोमनाथ पाटोळे, संजय रणदिवे, लहुजी शक्‍ती सेनेचे बारामती शहर अध्यक्ष अतुल गायकवाड, आरपीआयचे तालुका संपर्क प्रमुख निलेश जाधव, आरपीआय शहर युवक अध्यक्ष मयूर मोरे, तालुका अध्यक्ष जालिंदर घोडे, क्रांतिवीर लहजी शक्‍ती सेनेचे बारामती अध्यक्ष संजय खरात, विजय नेटके यांच्यासह शिरूर, फलटण, इंदापूर तालुक्‍यातून कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाचा शेवट नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांना निवेदन झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)