मातंग एकता शक्‍तीतर्फे पिंपरीत रास्ता रोको

पिंपरी – बुलढाणा जिल्ह्यातील इसरुळ येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मातंग एकता शक्‍तीच्या वतीने पिंपरीतील चौकात रास्ता रोको करण्यात आला. वाहने रोखून धरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, इसरुळ येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना केली. त्याला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी, सरपंच आणि कर्मचारी यांच्या निषेधार्थ पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी-चिंचवड मातंग एकता शक्ती संघटनेने जोरदार आंदोलन केले.

संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे निलंबन करण्याची मागणी संघटनेने केली आहे. पिंपरी चौकात आंदोलकांनी महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, इसरुळ येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तोडफोड करून पुतळ्याची विटंबना करणाऱ्या पोलीस अधिकारी, सरपंच आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन निलंबित करावे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा सन्मानाने बसविण्यात यावा. ज्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते त्वरित मागे घेण्यात यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)