माण-हिंजवडी गटासाठी भरघोस निधी देणार

पिरंगुट – माण-हिंजवडी जिल्हा परिषद गटासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुणे जिल्ह्यात हा गट विकासकामात आदर्श जिल्हा परिषद गट होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून गटातील प्रत्येक गावासाठी भरघोस निधी दिला जाईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांनी केले. रिहे (ता. मुळशी) येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून पंचेचाळीस लाख रुपयांची विविध विकासकामे करण्यात येत आहे. या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन करण्यात आले. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर बोलत होते. सभापती कोमल बुचडे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, उपसभापती पांडुरंग ओझरकर, माजी उपसभापती सारिका मांडेकर यांच्या हस्ते या कामांचे पूजन व उद्‌घाटन झाले.

मोरेवाडी येथे 10 लाख रुपये खर्च करून रस्ता करण्यात येणार आहे. तसेच येथील विहिर दुरुस्तीसाठी साडेचार लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. खेंगरेवाडी येथे 10 लाख रुपये खर्च करून करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे उद्‌घाटन व 6 लाख रुपये खर्च करून करण्यात आलेल्या रस्त्याचे उद्‌घाटन करण्यात आले. बोडकेवाडी व शेडगेवाडी येथे अनुक्रमे 10 लाख व 6 लाख रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी रंजना बोडके, अनिल मोरे, अनिल शिंदे, नामदेव शिंदे, गणपत ओझरकर, अनिता शिंदे, बाबाजी शेळके, दत्ता मालपोटे, ललिता खेंगरे, सुरेश पडळघरे, दत्ता पडळघरे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
रिहे (ता. मुळशी) : येथील विविध विकासकामांच्या उद्‌घाटनप्रसंगी सभापती कोमल बुचडे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, उपसभापती पांडुरंग ओझरकर, उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)